जुन्या काळात जेव्हां कधी आपली तब्येत बिघडायची तेव्हां डाॅक्टरांच्या आधी आपल्याला आपली आजी काही ना काही युक्ती सुचवुन आपले दुखणे बरे करायची. तर आज जाणून या आजीच्या त्या उपायांचा बटवा युक्ती
कमी प्रमाणात त्वचा जळल्यास
-मधाचे काही थेंब हळद पावडर मध्ये मिसळुन त्यास जळालेल्या भागावर लावणे.
-मध जखमेवर लावल्यास फायदा होतो.
-कॅलामाईन लोशन जखमेवर लावल्यास फायदा होतो.
चांगल्या झोपसाठी
-झोपण्याआधी गरम दुधात 1 चमचा मध मिसळुन प्यावे.
-झोपण्याआधी चेहरा थंड पाण्याने धुवुन घ्यावा.
अॅसिडीटी
-अर्धा चमचा जिरेपुड ताकात मिसळुन घेतल्यास अॅसिडीटी नाहीशी होते.
-दिवसातुन 2 ते 3 वेळा गुळाचा खडा तोंडात ठेउन चोखत राहावे.
-आपल्या आहारात नारळपाणी, काकडी, टरबुज, भोपळा, लिंबाचा रस, यांचा समावेश असावा.
-कोमट पाण्यात अर्धा चमचा मिठ व हळद अर्धा चमचा मिसळुन दिवसातुन 2 ते 3 वेळा या पाण्याने गुळण्या कराव्यात.
कफ ( खोकला )
मध एक प्राकृतिक कफनाशक मानल्या जाते.
मधासोबत 1 – 2 लिंबाचा रस मिसळुन 1 चमचा रात्री झोपण्याआधी घ्यावे.
1 चमचा मधासोबत अद्रकाचा रस 2, 3 थेंब मिसळुन सकाळी व रात्री झोपतांना घ्यावा.