नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी लोकसभेच नवे व्हेईकल स्क्रॅपेज धोरण जाहीर केले. त्यानुसार जुने वाहन भंगारात पाठवणाऱ्या व्यक्तीला नवीन वाहन खरेदी सवलत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. कोणी आपले वाहन असे मोडीत काढले आणि नवे वाहन खरेदी करत असेल तर त्याला पाच टक्के सवलत त्यासाठी दिली जाणार आहे.
त्यामुळे नागरिकांना नवे वाहन खरेदी करणे सोईस्कर होणार असल्याचा दावा गडकरी यांनी केला आहे. या धोरणामुळे स्क्रॅप सेंटर, वाहन उद्योग आणि स्पेअर पार्टशी संबंधित उद्योगांनाही याचा फायदा होणार आहे. याबाबतची आकडेवारी मांडताना गडकरी म्हणाले की आज देशात 20 वर्षांपेक्षा जुनी अशी 51 लाख वाहने आहेत. याशिवाय 15 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला अशी 34 लाख वाहने आहेत.
तसेच फिटनेस सर्टिफीकेट नसलेली आणि पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ झालेली आणखी 17 लाख वाहने आहेत. फिट म्हणजे रस्त्यावर चालवली जाण्यास योग्य अशा वाहनांच्या तुलनेत ही जुनी वाहने 10 ते 12 टक्के जास्त प्रदूषण करतात व ती वाहतुकीसाठी म्हणजे अपघतांच्या दृष्टीने अधिक धोकादायक असतात. ते पुढे म्हणाले की यापुढे पंधरा वर्षांचा कालावधी झाला तर व्यावसायिक वाहन आणि 20 वर्षांचा कालावधी झालेल्या खासगी वाहनाची नोंदणी आपोआप रद्द होणार आहे आणि ती भंगारात पाठवली जाणार आहेत.
प्रदूषण कमी करण्यासाठी आणि वाहन उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने हे नवे धोरण आणले असल्याचे सांगितले जाते आहे. त्यानुसार देशात स्क्रॅप इंडस्ट्रीतही तयार केली जाणार असून वाहन स्क्रॅप केल्यानंतर जे अवशेष अथवा भाग उरतील ते रिसायकल केले जाणार आहेत. त्यांचे जे पार्ट उरतील तेही कामास येतील व त्यांची किंमतही कमी असेल.
वर्षभरात टोल नाक्यांना गुडबाय
गडकरी यांनी सभागृहात टोल प्लाझांच्या संदर्भातही मोठी घोषणा केली. येत्या वर्षभरात देशभरातील सगळे टोल प्लाझा संपुष्टात आणले जातील असे त्यांनी जाहीर केले. मात्र आता टोल द्यावा लागणार नाही असा त्याचा अर्थ नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. तर वाहनांमध्ये आता जीपीएस यंत्रणा बसवली जाणार असून त्याचे मदतीने टोलची रक्कम आकारली जाणार आहे.
काय होणार या नव्या धोरणामुळे?
- जूनी वाहने मोडीत काढण्याच्या धोरणामुळे वाहन विक्री वाढेल
-
सरकारला जीएसटीतून 40 हजार कोटी रुपये मिळतील
-
वाहन उद्योगाची उलाढाल सध्या 4.5 लाख कोटी रुपयाची आहे. ती नव्या धोरणामुळे 10 लाख कोटी रुपयावर जाणार
-
जूने वाहन मोडीत काढून नवे वाहन घेणाऱ्याना रोड टॅक्समध्ये सवलत
-
वाहन मोडीत काढल्याचे प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांना नवे वाहन घेतांना नोंदणी शुल्क लागणार नाही
*जून्या वहनाना फिटनेस प्रमाणपत्र देतांना त्यांच्यावर मोठा कर लागणार आहे