शांतता समितीच्या सदस्यांनी वाचला समस्यांचा पाढा

गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर शांतता समितीची बैठक

नगर – आगामी काळात येणारे गणेश उत्सव व मोहरम हे सण एकत्रित येत आहे. त्यासाठी प्रशासनाने शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अन्यथा संबंधितावर नोटीसा बजावून कारवाई करावी. तसेच मोहरम मार्गावरील अतिक्रमण काढावे, तसेच रस्त्यावरील खड्डे बुजावेत अशा विविध मागण्या शांतता कमीटीच्या सदस्यांनी केल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवणात गणेश उत्सव व मोहरम संदर्भात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, पोलीस उपाध्यक्ष संदीप मिटके, नगर ग्रामीण उपविभागीय अधिकारी अजित पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, उमेश पाटील, अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, अरुण मुलांनी, विकास वाघ, प्रवीण पाटील आदींसह गणेश उत्सव मंडळाचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित.
गणेश उत्सव व मोहरम निमित्त शहरात अनाधिकृत लावणारे फ्लेक्‍स हिरोंवर प्रशासनाने कारवाई करावी. तसेच शहरात अवजड वाहनांवर बंदी घालावी. शहरातील मंगलगेट पोलीस चौकी दुसरीकडे स्थलांतर करावी. त्यामुळे अडथळा निर्माण होणार नाही.

संजय सपकाळ म्हणाले की, भिंगार येथे 9 व्या दिवशी गणपती विसर्जन केले जाते. मात्र त्या दिवशी मोहरम असल्याने आम्हाला 8 व्यादिवशी विसर्जनास परवांगी द्यावी. कारण दोन्ही उत्सव हे एकाच मंडळातील कार्यकर्ते साजरे करत असतात. त्यामुळे त्यांची धावपळ होते. जातीय सलोखा पाहवायाचा असेल तर प्रशासनाने भिंगार येथे यावे कारण, गणपती व मोहरम हे दोन्ही उत्सव एकत्र साजरा केला जात आहे. तसेच भिंगार वेशीजवळ शहर वाहतूकचा पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे. तसेच दहीहंडी चा अनावश्‍यक खर्च टाळून सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्थांना मदत देण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते उबेद शेख यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)