मुंबई – राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी ठाकरेंनी थेट शिंदे गटाला डिवचत ‘मैदानात या’ असं आव्हान केलं होत. जन्म दिवस जरी भुजबळांचा असला तरी चर्चा मात्र ठाकरेंच्या भाषणाची होती. आता ठाकरेंच्या या आव्हानाला शिंदे गटाकडून उत्तर देण्यात आलं आहे.
आम्हीपण मैदानातच आहोत, आम्ही घरात बसलेलो नाही. हे अडीच वर्षं घरात बसले होते, तेव्हाही आम्ही मैदानातच होतो आणि आत्ताही आहोत. असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांनी ठाकरेंच्या आव्हानावर दिल आहे. भुमरे पुढे म्हणाले, हे आमच्यामुळे अडीच वर्षानंतर मैदानात आले आहेत. ही क्रांती झाली नसती तर अजून अडीच वर्षं घरातच बसून राहिले असते. कोण कोणाल काय दाखवतं हे अडीच वर्षानंतर कळेलच असा इशारा भुमरे यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
भूबाळांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणात शिंदे गटावर निशाणा साधला होता. आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जावं लागत आहे. हिम्मत असेल तर तुम्ही मैदानात या माझी तयारी आहे. आम्हाला मैदान कस मिळणार नाही यापेक्षा एका मैदानात एका व्यासपीठावर येऊ मग काय व्हायचंय ते होऊन जाऊदे असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी यावेळी दिल होत.