जीडीपीच्या आकड्याने पुन्हा प्रश्नचिन्ह

आर्थिक विकासाच्या दृष्टीनं प्रगती साधण्यासाठी २३ ऑगस्ट रोजी केलेल्या तात्पुरत्या घोषणांमुळं झालेली मलमपट्टी वरवरची ठरल्यानं अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी राष्ट्रीय बँकांचं एकत्रीकरण व त्यातील गव्हर्नन्स बद्दल काही सूचना वजा घोषणा केल्या व सध्याची आपली २.६ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था लवकरच ५ ट्रिलियन डॉलरकडं कशी सरकतीय हे पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न केला. ज्यात १४ राष्ट्रीयकृत बँका या नफ्यात असून एकूणच एनपीएचं प्रमाण सुमारे दोन टक्क्यांनी घसरलं आहे असं वर्तवलं.

नक्कीच बँकिंग क्षेत्रासाठी ह्या सुखावह बातम्या आहेतच परंतु या सत्रानंतर लागलीच जाहीर झालेल्या २०२० वर्षातील प्रथम तिमाहीतील आपल्या जीडीपी वाढीच्या आकड्यानं सर्वांच्याच मनात प्रश्नचिन्ह निर्माण केलं. ५.७ % अर्थव्यवस्था वाढीचा दर अपेक्षित असताना आकडेवारी ५% आल्यानं पुन्हा एकदा अपेक्षेनं त्यांच्याकडं निर्मळपणे पाहण्यावाचून काही गत्यंतर दिसत नाही असं दिसतंय. असो, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७२ च्या खाली गेलेलं रुपयाचं मूल्य, ऑगस्ट महिन्यातील वाहन कंपन्यांचे विक्रीचे आकडे व अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधीच्या कार्यालयाने बुधवारी पुष्टी केल्यानुसार अमेरिकेच्या ३०० अब्ज डॉलर्सच्या चिनी वस्तूंवर अतिरिक्त ५ टक्के शुल्क आकारण्याबाबत १ सप्टेंबरपासून प्रत्यक्षात केली जाणारी त्याची अंमलबजावणी, या गोष्टी उद्या आपल्या बाजारावर प्रतिबिंब पडल्याशिवाय राहणार नाहीत. येणाऱ्या दिवसांत, तांत्रिकदृष्ट्या निफ्टीस प्रथम अडथळा हा १११५० – १११८० या पट्ट्यात संभवतो व तद्नंतर निफ्टी टप्प्याटप्प्यानं ११३५०, ११४७० व ११७३० या पातळ्यांकडं प्रवासास निघू शकते तर खालील बाजूस, ११८७० व ११७२० या आधारपातळ्या नजीकच्या काळात टेकू म्हणून विचारात घेता येऊ शकतात.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×