शिरूर शहरात कोरोनाची पु्न्हा उचल, आणखी आठ रुग्णांची भर

शिरूर (प्रतिनिधी)शिरूर शहरातील सैनिक सोसायटी मधील 68 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह असून, शिरूर शहरा सह तालुक्यात आठ रुग्ण कोरोना बाधित आढळले असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे व शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली आहे. शिरूर पंचक्रोशी मधील सरदवाडी येथे डॉक्टरांच्या संपर्कात आलेले दोघे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने, प्रथमत रुग्ण निघाल्याने सरदवाडी गावात घबराट पसरली आहे.

शिरूर शहरातील सैनिक सोसायटी येथील वकिलाच्या संपर्कात आलेले त्याचे वडील 68 वर्षीय वकील १ , गणेगाव खालसा येथील १, रामलिंग रोड जाधव मळा १, शिक्रापूर १, सणसवाडी १, कोरेगाव भीमा १, सरदवाडी २, असे शिरूर तालुक्यातील सात गावात आठ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने शिरूर तालुक्यातील कोरोना ची साखळी रोज वाढताना दिसत आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, आंबेगाव आणि बारामती ही गावे प्रशासनाने कोरोना बाधित यांची वाढती संख्या पाहून लॉकडाऊन केली आहे. मग शिरूर तालुक्यातून आणखी किती रुग्ण झाल्यावर लॉकडाऊन होणार आहे? असा सवाल नागरिकांमध्ये आता उपस्थित राहिला आहे. शिरूर शहरात २८ रुग्ण तर शिरूर शहरासह शिरूर तालुक्यात १९० रुग्ण झाले आहेत. शिरूर तालुक्यातील अनेक गावात आता रोजच नव्याने रुग्णांची वाढ होत आहे. आज सकाळपर्यंत आठ रुग्ण निघाले असून, दुपारच्या सत्रात  काही रुग्ण येण्याची शक्यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.