वाॅशिंग्टन – बायडेन यांनी आपल्या सरकारचे नेमके परराष्ट्र धोरण काय असेल यावर या भाषणात सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले की, अमेरिका आता पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर सक्रिय होणार असून आम्ही जगाशी आमचे तुटलेले नाते पुन्हा जोडणार आहोत.
अमेरिकेच्या मित्रांशी तुटलेले संबंध पुन्हा स्थापित करणार आहोत असे त्यांनी सांगितले. जगापुढे जी नवी आव्हाने उभी राहिली आहेत त्यासाठी आम्ही आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात करीत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चीनच्या वाढत्या महत्त्वाकांक्षांना आवर घालणे आणि रशियाने आमच्या देशातील लोकशाही विस्कळीत करण्याचे जे काम केले आहे ते दुरुस्त करणे यावर आता आमचे लक्ष केंद्रित राहील असे ते म्हणाले.
जागतिक पातळीवर करोनाच्या आव्हानांपासून अण्विक प्रसारापर्यंतच्या साऱ्याच प्रश्नांवर आता अमेरिका सक्रिय होत असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी पुन्हा दिले. हे सारे काम आम्ही एकटे करणार नाही. जगालाही आम्ही त्यात बरोबर घेणार आहोत असे ते म्हणाले.