पुणे – ओसवाल बंधू समाजाच्या अध्यक्षपदी वालचंद संचेती यांची फेरनिवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी प्रकाश पारख यांची, कोषाध्यक्षपदी नेमिचंद कर्नावट यांची, मानद सचिवपदी जवाहरलाल बोथरा यांची आणि सहसचिवपदी पोपटलाल कोठारी यांची एकमताने निवड झाली आहे.
कर्नावट, बोथरा आणि कोठरी पूर्वीही याच पदावर कार्यरत होते. ओसवाल बंधू ही सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली संस्था आहे. संस्थेमार्फत विविध सामाजिकपर उपक्रम राबविले जातात.
संस्थेकडून समाजातील आथिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते. तसेच, सर्वच स्तरातील लोकांना हृदय प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपणनासाठी वैद्यकीय मदत दिली जाते.