प्लॅस्टिक बंदीसाठी आळंदीत पुन्हा मोहीम

सात किलो प्लॅस्टिक जप्त, पाच हजार रुपये दंड वसुली

आळंदी-आळंदी नगरपरिषद हद्दीत नवीन भाजी मंडई, जुनी भाजी मंडई (चाकण चौक) येथे आज दुपारी आळंदी नगरपालिकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामराव खरात यांनी चोरून कॅरी बॅग वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. यात सात किलो प्लॅस्टिक तसेच पाच हजार रुपये दंड वसुली करण्यात आली.

भाजी मंडईतील व्यापाऱ्यांना नगरपालिकेने मार्फत सक्त ताकीद देण्यात आली आहे. यापुढे कॅरीबॅग वापरात आल्याचे दिसल्यास जागेवर पाच हजार रुपये दंड वसूल केला जाईल किंवा आपणास दिलेले दिलेली परवानगी रद्द करण्यात येईल येईल असे व्यापारी वर्गास सुनावण्यात आले. यावर काही व्यापाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, कॅरीबॅग विक्रीसाठी पुणे, पिंपरी चिंचवड व परिसरातून विक्रेते येतात. ते सांगतात की, ही कॅरीबॅग 50 मायक्रोनची आहे, ती वापरण्यास हरकत नाही. यापेक्षा जागेवरच प्लॅस्टिकचे उत्पादन बंद करावे. आमच्यापर्यंत माल आलाच नाही तर आपोआपच कॅरीबॅग नष्ट होऊन याठिकाणी कापडी पिशव्या बाजारात येतील. कारवाईदरम्यान आरोग्य विभागाच्या मुकादम मालन पाटोळे, भागवत सोमवंशी, रमेश थोरात, खंडू चव्हाण, मल्हार बोरगे, नाना घुंडरे, तसेच इतर बाह्य कर्मचारी आदींनी सहभाग घेतला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×