#IPL2020 : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने टाॅस जिंकला

दुबई – कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचेच किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात पारडे जड राहणार आहे.

सलामीच्या सामन्यात बेंगळुरूने विजय मिळवला होता तर, पंजाबला पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला होता. अर्थात असे असले तरीही बेंगळुरूचा संघ पाहिला तर पंजाबला या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर त्यांना कोहली, एबी डीविलियर्स, देवदत्त पडीक्कल व ऍरन फिंच यांना रोखावे लागेल. तसेच यजुवेंद्र चहल, नवदीप सैनी यांच्या गोलंदाजीला सामोरे जावे लागणार आहे.

दरम्यान, या सामन्यास काही वेळातच सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा  रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या बाजूने लागला आहे. कर्णधार विराट कोहली याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला असून किंग्ज इलेव्हन पंजाबला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.

दरम्यान, पंजाबने पहिल्या सामन्यात विजयाची आशा निर्माण केली होती. मात्र, मयंक आग्रवाल बाद झाल्यानंतर त्यांना आवश्‍यक दोन धावाही काढता आल्या नव्हत्या. या सामन्यात त्यांना नितीन मेनन या पंचाने दिलेल्या एका चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. मात्र, आता बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात त्यांना आपल्या फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही चमक दाखवावी लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.