#IPL2020 : थरारक सामन्यात बेंगळुरूचा विजय, सुपरओव्हरमध्ये मुंबईचा केला पराभव

दुबई – दुबईच्या मैदानावर रंगलेल्या मुंबई इंडियन्स विरूध्द राॅयल चॅलेंजर बेंगळुरू या सामन्याचा थरार सुपर ओव्हरपर्यंत पोहचला आणि यामध्ये विराट कोहलीच्या राॅयल चॅलेंजर बेंगळुरूने बाजी मारली. सुपर ओव्हरमध्ये बेंगळुरूसमोर मुंबईने 8 धावांचं सोपं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूवर बेंगळुरूला 1 धावेची गरज असताना कर्णधार विराट कोहलीने चौकार खेचत विजय मिळवून दिला. दोन्ही संघामध्ये निर्धारित षटकातला सामना बरोबरीत सुटल्याने सामन्याचा निकाल सुपरओव्हरमध्ये लावण्यात आला.

तत्पूर्वी, निर्धारित षटकांच्या सामन्यात मुबंईचा कर्णधार रोहितने टाॅस जिंकून बेंगळुरूला फलंदाजीस पाचारण केलं होतं. त्यानंतर बेंगळुरूने अॅरोन फिंच 52(35), देवदत्त पदिक्कल 54(40), विराट 03(11), एबी डि विलियर्स नाबाद 55(24) आणि शिवम दुबे 27(10) यांच्या फलंदाजीच्या जोरावर 20 षटकांत 3 बाद 201 अशी धावसंख्या उभारली होती.

बेंगळुरूने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने इशान किशनच्या 99(58) आणि काईरन पोलार्डच्या नाबाद 60(24) धावांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकांत 5 बाद 201 धावा केल्या आणि सामना टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये राॅयल चॅलेंजर बेंगळुरूने मुंबईवर मात करत विजय साकारला. एबी डि विलियर्स सामन्याचा मानकरी ठरला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.