पुणे – आयपीएल 2022 चा 49 वा सामना आज खेळला जात आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
चेन्नईच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. मिचेल सँटनरच्या जागी मोईन अलीचे पुनरागमन झाले आहे. तर दुसरीकडे बंगळुरू संघाने या सामन्यात संघात कोणताही बदल केलेला नाही.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर प्लेइंग-11 : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग-11 : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/ विकेटकीपर), ड्वेन प्रिटोरियस, महिश थिक्षाना, मुकेश चौधरी, सिमरनजीत सिंग