वुमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या सिझनला १४ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. या सिझनमध्ये आतापर्यंत ४ सामने झाले आहेत. यामध्ये आरसीबीने २, दिल्ली आणि गुजरातच्या संघाने प्रत्येकी १ सामना जिंकला आहे. या सिझनमध्ये आरसीबीच्या संघाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
काय आहे ‘तो’ विक्रम?
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली. प्रतिस्पर्धी संघाला सर्वाधिक वेळा ऑलआऊट करण्याचा विक्रम आरसीबीच्या नावावर झाला आहे. आरसीबीच्या आधी हा विक्रम मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्या नावावर होता.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खेळलेल्या 20 सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला तीन वेळा ऑलआऊट केलं आहे. तर यूपी वॉरियर्सने 18 सामन्यात तीन वेळा अशी कामगिरी केली आहे. आरसीबीने 20 सामन्यात 4 वेळा प्रतिस्पर्धी संघाला ऑलआऊट करून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.