RCB Sues Uber Moto Over Travis Head Controversial Ad : आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली उच्च न्यायालयात उबर मोटोविरुद्ध खटला दाखल केला आहे. हे प्रकरण उबर मोटोच्या जाहिरातीशी संबंधित आहे. आरसीबीचा आरोप आहे की, उबर मोटोच्या जाहिरातीत एसआरएचचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला घेऊन अपमानास्पद टिप्पण्या केल्या आहेत. ‘बॅडीज इन बेंगलोर फूट. ट्रॅव्हिस हेड’ असे या जाहिरातीचे शीर्षक आहे, जे आतापर्यंत १.३ दशलक्ष वेळा पाहिले गेले आहे. आरसीबीचे म्हणणे आहे की त्यांच्या ट्रेडमार्कचा गैरवापर झाला आहे.
आरसीबीच्या वकिलाने काय म्हटले?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वतीने वकील श्वेताश्री मजुमदार यांनी न्यायालयात हा मुद्दा मांडला. त्यांनी सांगितले की, जाहिरातीत ट्रॅव्हिस हेड आरसीबीचा ट्रेडमार्क खराब करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये, हेड चिन्नास्वामी स्टेडियमकडे धावत आहे. तो ‘बेंगळुरू विरुद्ध हैदराबाद’ साइनबोर्डवर स्प्रे पेंटने ‘रॉयली चॅलेंज्ड’ लिहितो.
Breaking:
Royal Challengers Bengaluru (@RCBTweets ) takes Uber @Uber_India to Delhi High Court over disparaging its trademark in an ad featuring Australian Cricketer Travis Head. RCB has contended that calling it “Royally Challenged Bengaluru” is disparaging. RCB has contended… pic.twitter.com/i4ELebCWH8— Bar and Bench (@barandbench) April 17, 2025
आरसीबीच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकील श्वेताश्री मजुमदार यांनी न्यायालयाला जाहिरातीची माहिती दिली आणि सांगितले की, व्हिडीओमधील एक पात्र म्हणून ट्रॅव्हिस हेड आरसीबीच्या ट्रेडमार्कचा अनादर करत आहे. मजुमदार म्हणाले की, सनरायझर्स हैदराबाद आयपीएल संघाचे प्रायोजक असलेल्या उबरमोटोने त्यांच्या उत्पादनांचा प्रचार करताना त्यांच्या व्यवसायात आरसीबी ट्रेडमार्कचा वापर केला.
हेही वाचा – DC vs RR : मिचेल स्टार्कच्या ‘बॅकफूट नो बॉल’वरून वाद! नक्की काय आहे ICCचा नियम? जाणून घ्या
उबर मोटोने मांडली आपली बाजू –
Hyderbadi Travis Head 😂😂in Uber Moto Ad . pic.twitter.com/NmzPWMTICs
— Yash (@YashCricOG) April 5, 2025
दुसरीकडे, उबर मोटोच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलांनी सांगितले की, या खटल्यात एक मूलभूत समस्या आहे आणि आरसीबीला सामान्य लोकांच्या विनोदबुद्धीची “खूप कमी” समज आहे. त्यांनी सांगितले की, जाहिरातीचा सामान्य संदेश असा आहे की १३ मे रोजी बेंगळुरू क्रिकेट स्टेडियमवर आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना आहे आणि ते वाहतूक कोंडीचे शहर असल्याने लोकांनी उबर मोटोचा वापर करावा.
हेही वाचा – DC vs RR : दिल्लीच्या बॉलिंग कोचवर BCCI ची मोठी कारवाई! नेमकं प्रकरण काय? पाहा VIDEO
न्यायमूर्ती काय म्हणाले?
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती सौरभ बॅनर्जी यांनी आरसीबीच्या अंतरिम मनाई याचिकेवरील आदेश राखून ठेवला. न्यायालयाने म्हटले, “मी आदेश राखून ठेवत आहे. मी आदेश पारित करेन आणि अर्ज निकाली काढेन.”