Phil Salt returned to the UK to treat a finger injury : आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या अंतिम टप्प्यात आरसीबी (RCB) संघाला एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा धडाकेबाज सलामीवीर फिल सॉल्ट दुखापतीमुळे मायदेशी परतला आहे. सॉल्टच्या गैरहजेरीमुळे गुणतालिकेत अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आरसीबीच्या चिंतेत वाढ झाली आहे. सध्या आयपीएलमध्ये प्लेऑफचे चित्र स्पष्ट झालेले नसून, प्रत्येक सामन्याचा निकाल गुणतालिकेवर परिणाम करत आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात झाली दुखापत – (Phil Salt Injury) १८ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान सहाव्या षटकात चौकार वाचवताना फिल सॉल्टच्या बोटाला गंभीर दुखापत झाली होती. सुरुवातीला ही दुखापत फारशी गंभीर वाटत नव्हती, परंतु नंतर दुखापतीचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर त्याने सलग तीन सामने खेळले नाहीत. अखेर ‘ईएसपीएनक्रिकइन्फो’च्या वृत्तानुसार, उपचारासाठी सॉल्ट मायदेशी (युनायटेड किंगडम) परतला आहे. सॉल्टची कामगिरी आणि चिंतेचा विषय – (IPL 2026) 🚨 PHIL SALT UPDATE 🔴🏏 – Returned to UK for scans 🏥 – Dealing with a finger injury 🩹 – RCB & Salt hopeful for a quick recovery 🤞 – Expected to return to India if cleared soon ✈️#PhilSalt #RCB #IPL2026 #InjuryUpdate #Cricket 🔥🏏 pic.twitter.com/wM71oO4afq — Akaran.A (@Akaran_1) May 4, 2026 फिल सॉल्टने या मोसमात ६ सामन्यात १६८.३३ च्या दमदार स्ट्राईक रेटने २०२ धावा केल्या आहेत. त्याच्या अनुपस्थितीत जेकब बेथेल विराट कोहलीसोबत डावाची सुरुवात करत आहे. मात्र, बेथेलला अद्याप अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. त्याने ३ सामन्यांत मिळून केवळ ३९ धावा केल्या आहेत. सॉल्ट संपूर्ण हंगामातून बाहेर पडलेला नाही, त्यामुळे आरसीबी संघ प्लेऑफमध्ये पोहोचल्यास आणि तो तंदुरुस्त झाल्यास तो पुन्हा संघात परतू शकतो. सॉल्ट पूर्णपणे बाहेर पडल्याशिवाय आरसीबीला नवा बदली खेळाडू (रिप्लेसमेंट) घेता येणार नाही. हेही वाचा – Babar Azam Troll : हिटमॅनची कॉपी करणं बाबरला पडलं महागात; पीएसएल २०२६ च्या जेतेपदानंतर होतोय ट्रोल? पाहा VIDEO पुढील सामन्यात आरसीबीसमोर लखनौचे आव्हान – (Phil Salt Injury) पुढील सामन्यात आरसीबीसमोर लखनौचे आव्हान सध्या आरसीबीचा संघ गुणतालिकेत पहिल्या चार संघांत (टॉप ४) असून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. फिल सॉल्टच्या जागी जेकब बेथेललाच आगामी सामन्यांमध्ये सलामीला खेळावे लागण्याची शक्यता आहे. गुरुवार, ८ मे रोजी आरसीबीचा पुढचा सामना लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध होणार असून, या सामन्यात आरसीबीला विजयी लय कायम ठेवावी लागणार आहे.