नवी दिल्ली – सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर विजयासाठी 188 धावांचे आव्हान ठेवले आहे.
Half-centuries from Shikhar Dhawan and Shreyas Iyer guide the @DelhiCapitals to a total of 187/5 after 20 overs.
Will the @RCBTweets chase this down? #DCvRCB pic.twitter.com/dMIJ80fyUo
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2019
दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीची निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने 20 षटकांत 5 बाद 187 धाव संख्येपर्यत मजल मारली. दिल्लीकडून फलंदाजीत श्रेयस अय्यरने 37 चेंडूत (2 चौकार आणि 3 षटकार) सर्वाधिक 52 धावा केल्या, तर शिखर धवन याने 37 चेंडूत (5 चौकार आणि 2 षटकार) 50 धावा केल्या. शेरफेन रूदरफोर्डने 13 चेंडूत नाबाद 28 तर अक्षर पटेलने 9 चेंडूत 16 धावा करत संघाची धावसंख्या 187 पर्यंत नेली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून युजवेंद्र चहलने 2 आणि उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.