आरसी बुक उशिरानेच!

पुणे – वाहन खरेदीनंतर वाहनमालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळणारे आरसी बुक (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) मालकापर्यंत पोहोचण्यास लागणारा वेळ दिवसेंदिवस “वाढत’ आहे. “हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट’वर असणाऱ्या “यूआयडी’ क्रमांकाअभावी “आरसी बुक’ छपाईला वेळ लागत आहे.

नवीन वाहन खरेदीनंतर, आरटीओकडे नोंदणी होऊन प्रमाणपत्र देण्यात येते. विशेष म्हणजे हे आरसी बुक पंधरा दिवसांमध्ये वाहन मालकापर्यंत पोहोचणे अपेक्षित असते. मात्र मागील काही महिन्यांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या निर्णयानुसार वाहनांना “हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट’ बसविणे बंधनकारक केले आहे. या नंबर प्लेटवर “यूआयडी’ नंबरच्या समावेश करण्यात आला आहे. हा क्रमांक वितरक वाहन प्रणालीमध्ये नमूद करणार आहेत. या क्रमांकाची “नॅशनल इन्फॉर्मेटिक्‍स सेंटर’कडून पडताळणी करण्यात आहे. त्यानंतर आरसी बुकसाठी नंबर पाठविण्यात येणार आहेत. पर्यायाने, आरसीबुकची छपाई करताना यंत्रणेमध्ये “यूआयडी’ क्रमांक नमूद करणे आवश्‍यक आहे.

मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये वितरकांकडून हा क्रमांक आलेला नाही. त्यामुळे या क्रमांकाअभावी “आरसी बुक’ची छपाई रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली. नंबर प्लेटवरील “यूआयडी’ क्रमांक वाहन प्रणालीत नमूद नसल्याने, आरसी बुकची छपाईसाठी आवश्‍यक असणारी फाईल तयार होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आरटीओकडून याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आरसी बुकच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांना मात्र, आरसी बुक मिळेपर्यंत वाहन कागदपत्रांशिवाय चालविण्याप्रकरणी लागणाऱ्या दंडाचा भुर्दंड वाहनचालकांना सोसावा लागणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)