श्रीवास्तन सूर्यकुमार, आकाश अहलावत, आदित्य बलसेकर यांची आगेकूच

आरबीएल-एटीटी आशियाई मानांकन पुरुष टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धा

मुंबई – पुरुष गटात श्रीवास्तन सूर्यकुमार, आकाश अहलावत, आदित्य बलसेकर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून येथे होत असलेल्या प्रॅकटेनिस व एमएसएलटीए यांच्या संलग्नतेने आयोजित आणि आशियाई टेनिस संघटना(एटीएफ) व अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 3000डॉलर आरबीएल-एटीटी आशियाई मानांकन पुरुष टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना येथील टेनिस कोर्टवर आजपासून सुरु झालेल्या रत्नाकर बॅंक लिमिटेड(आरबीएल)यांनी प्रायोजित केलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात पहिल्या पात्रता फेरीत श्रीवास्तन सूर्यकुमारने ऋषभ गुंदेचाचा 5-7, 6-2, 11-9 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. चुरशीच्या झालेल्या लढतीत आकाश अहलावत याने मनवीर सिंग रंधावाचा 6-4, 1-6, 10-7 असा पराभव केला. स्पर्धेच्या मुख्य फेरीच्या सामन्यांना बुधवार, 24 एप्रिल रोजी प्रारंभ होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.