आरबीआयची २४ तासांत दोन बँकांवर कारवाई; ‘या’ बँकेवर निर्बंध

नवी दिल्ली – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २४ तासांमध्ये दोन बँकेवर निर्बंध घातले आहेत. लक्ष्मी विलास बँकेनंतर आता जालना जिल्ह्यामधील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घालण्यात आले आहे. सहा महिन्यांसाठी हे निर्बंध असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.

माहितीनुसार, नवीन ठेवी स्विकारण्यावरही बँकेवर निर्बंध असणार आहेत. कोणालाही कर्ज देऊ शकत नाही किंवा बँक कर्ज घेऊही शकत नाही. तसेच जुन्या कर्जांमध्ये नूतनीकरण करण्यासाठी बँक कुठलीही नवी गुंतवणूक करू शकत नाही. हे निर्बंध सहा महिन्यांसाठी असणार आहेत.

केंद्र सरकारने मंगळवारी लक्ष्मीविलास खासगी क्षेत्रातील बँकेवर काही निर्बंध लादले आहेत. सरकारच्या निर्बंधांमुळे आता बँकेच्या खातेदारांना दररोज २५ हजार इतकीच रक्कम काढता येणार आहे. हे निर्बंध १६ डिसेंबरपर्यंत लागू राहतील. अर्थ मंत्रालयातर्फे याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने आरबीआयच्या सल्ल्याने लक्ष्मी विलास बँकेबाबत ही कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार बँकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत चालल्याचे आढळून आले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.