मुंबई – रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया(आरबीआय) “ऍमेझॉन पे’ला मोठा दणका दिला आहे. आरबीआयने “ऍमेझॉन पे’ला तब्बल 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्रीपेड पेमेंटमध्ये नियमांचे पालन केले नसल्याचे निदर्शनास आल्याने हा दंड ठोठाविण्यात आला आहे. आरबीआयने म्हटले की, केवायसी संदर्भातील आरबीआयच्या नियमांच्या निर्देशांचे पालन “ऍमेझॉन पे’ने केलेले नसल्याचे आमच्या लक्षात आले आहे.
त्यामुळे त्यांच्यावर आरबीआय कायद्याच्या कलम 30 अंतर्गत दंड ठोठविण्यात आला आहे. तसेच या चुकीवर स्पष्टीकरण देण्यासही त्यांना सांगण्यात आले आहे. आरबीआयने दंड ठोठावताना, ही कारवाई नेहमी प्रमाणे होणाऱ्या नियमभंगांच्या तत्वावर करण्यात आली असल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यामध्ये “ऍमेझॉन पे’च्या कायदेशीर बाबींवर प्रश्न उपस्थित करण्यात आलेला नाही.