नवी दिल्ली , वृत्तसंस्था : देशातील जनता सध्या मोठ्या महागाईचा सामना करीत असताना आता सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक मोठा फटका बसणार आहे. RBI ने( RBI Hike Repo Rate) रेपो दरात वाढ केली आहे. आज बुधवारी RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पॉलिसी रेपो रेट 50 बेसिस पॉईंटसने वाढवून 4.90% झाल्याची माहिती दिली. त्यामुळे आता बँकेच्या ग्राहकांना जोरदार फटका बसणार असून होम लोन, पर्सनल लोन, कार लोन च्या EMI मध्ये वाढ होऊ शकते.
The MPC voted unanimously to increase the policy repo rate by 50 bps to 4.90%: RBI Governor Shaktikanta Das pic.twitter.com/KS8RswFIEy
— ANI (@ANI) June 8, 2022
रेपो दर वाढण्यामागे काय आहे कारण ?
याबाबत RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी माहिती दिली की मॉनिटरिंग पॉलिसी कमिटीने पॉलिसी रेपो रेट 50 बेसिस पॉईंटसने वाढवून 4.90% करण्यासाठी एकमताने मतदान केले आहे. 8 जून रोजी चलनविषयक धोरण समितीच्या तीन दिवसीय बैठकीनंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 5 आठवड्यांत दुसऱ्यांदा रेपो दरात बदल केला आहे. गेल्या महिन्यात 4 मे रोजी आरबीआयने अचानक रेपो दरात 0.40 बेसिस पॉईंटची वाढ जाहीर केली होती. त्याच RBI ने आज 5 आठवड्यांनंतर म्हणजेच 8 जून 2022 रोजी रेपो दरात पुन्हा 50 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. जागतिक बाजारपेठेत वस्तूंच्या वाढत्या किमती आणि पेट्रोल आणि डिझेलसह इतर इंधनावरील वाढत्या दबावामुळे आरबीआयने रेपो दरात बदल केल्याचे सांगण्यात आले आहे.
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने 31 मे रोजी जाहीर केलेल्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताचा GDP वाढीचा दर 8.7% असण्याचा अंदाज आहे. तर 2021-22 या आर्थिक वर्षात वास्तविक जीडीपी महामारीच्या पातळीपेक्षा म्हणजेच 2019-20 पेक्षा जास्त आहे.