आरबीआयचे सर्वसामान्यांना दिवाळी गिफ्ट; रेपो दरात कपात 

मुंबई – दसरा-दिवाळीआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्यांना खुशखबर दिली आहे. आरबीआयने रेपो दरात पाचव्यांदा कपात केली आहे. रेपो दरामध्ये ०.२५ टक्क्यांनी ही कपात करण्यात आली आहे.

यामुळे आता रेपो दर ५.४० टक्क्यांवरून ५.१५ टक्के इतका झाला आहे. त्यामुळे सामान्य जनतेसाठी कर्जावरील व्याज कमी होऊन, कर्जाचा हफ्ता कमी होणार आहे. तसेच नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठी कर्जाचे दर कमी होतील.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने वित्तीय वर्ष २०१९-२०२०मधील जीडीपीचा अंदाज ६.९ टक्क्यांवरून ६.१ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. तसेच २०२० च्या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर ७.२ टक्के राहण्याचा अंदाज आज रिजर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने वर्तविला आहे.

यांना होणार फायदा 
घर तसेच वाहनांसाठी घेतलेल्या कर्जाच्या हफ्त्यांमध्ये कपात होणार. रेपो रेट मध्ये कपात झाल्याने नवीन कर्ज घेणाऱ्यांना स्वस्तात मिळेल.

रेपो रेट म्हणजे काय ?  
सार्वजनिक बँका आपल्या कर्जाची मागणी पूर्ण करण्यासाठी रिजर्व्ह बँकेकडून पैसे घेते, त्या पैशांवर रिजर्व्ह बँकेकडून जो दर आकारला जातो त्यास रेपो रेट असे म्हणतात.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.