जागतिक व्यापारात आणखी घट होण्याची भीती- आरबीआय

नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्था आधीच मंदीच्या जाळ्यात अडकली आहे. दरम्यान, जागतिक व्यापारात आणखी घट होण्याची शक्यता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) व्यक्त केली आहे. बँकेने आपल्या चलनविषयक धोरण अहवालात म्हटले आहे की यावर्षी भविष्यातील संकेतावरून जागतिक व्यापारात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

“जागतिक व्यापारातील मंदी २०१८ च्या उत्तरार्धात सुरू झाली ती २०१९ मध्येही सुरू आहे. भविष्यात जागतिक व्यापार आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत.” असे आरबीआयने म्हटले आहे.

अमेरिकेतील वास्तविक स्थूल उत्पादनांचा (जीडीपी) विकास दर कमी झाला आहे. तेथील जीडीपी २०१९ च्या दुसर्‍या तिमाहीत दोन टक्क्यांवर आला आहे. तसेच, ब्रेक्सिट आणि व्यापार तणावाच्या दरम्यानच्या अनिश्चिततेमुळे २०१९ च्या दुसर्‍या तिमाहीतही युरो क्षेत्राच्या जीडीपी वाढीची गती कमी झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.