सोने विक्रीबाबतच्या वृत्तावर आरबीआयने दिले स्पष्टीकरण

सोन्याची विक्री किंवा सोन्याचा व्यापार बॅंक कधीच करत नाही -आरबीआय
नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने तब्बल तीन दशकांनंतर पहिल्यांदाच सोन्याची विक्री सुरू केली आहे. तसेच बॅंकेने जालान समितीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून सोन्याच्या ट्रेडिंगमध्येही सक्रीय झाल्याचे वृत्त दोन दिवसांपासून समोर येत आहे. त्याबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

आरबीआय सोन्याची विक्री किंवा व्यापार करत असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. पण आरबीआयकडून अशाप्रकारे कोणत्याही सोन्याची विक्री किंवा सोन्याचा व्यापार देखील आरबीआय करत नाही, असे बॅंकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ट्‌विटरद्वारे आरबीआयने हे स्पष्टीकरण दिल आहे. अशाप्रकारचे वृत्त म्हणजे केवळ अफवा असल्याचे बॅंकेने स्पष्ट केले आहे.

आरबीआयने जुलै महिन्यापासून एकूण 5.1 अब्ज डॉलरचे सोने खरेदी केले आहे, तर 1.15 अब्ज डॉलर सोन्याची विक्री केली आहे. आरबीआयकडे ऑगस्टच्या अखेरपर्यंत 19.87 दशलक्ष औंस कोटी सोने होते तर, 11 ऑक्‍टोबर रोजी फॉरेक्‍स रिझर्व्हमध्ये केवळ 26.7 अब्ज डॉलर सोने होते, अेम दोन दिवसांपूर्वी आलेल्या वृत्तात म्हटले होते. याशिवाय सोन्याच्या विक्रीतून निर्धारीत लाभापेक्षा जास्त लाभ सरकारसोबत आरबीआय शेअर करणार असल्याचेही या वृत्तात म्हटले होते. पण, आरबीआयने हे वृत्त फेटाळून लावले असून या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

1 Comment
  1. Sudhir Gore says

    सोन्याची विक्री किंवा सोन्याचा व्यापार बॅंक कधीच करत नाही -आरबीआय हे वृत्त वाचले हे खरे आहे ना?
    मग ज्या वृत्त पत्रातून खोटी प्रसिध्दी दिली गेली त्यावर खटला का टाकता येत नाही

Leave A Reply

Your email address will not be published.