आरबीआयचे बॅंका व एनबीएफसींच्या व्यवस्थापनाकडे लक्ष

चेन्नई – बॅंकांचे एनपीए वाढलेले आहे त्यामुळे बॅंकांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर एनबीएफसींना भांडवल सुलभतेचा प्रश्न सतावत आहे. या बाबी ध्यानात घेऊन बॅंका आणि एनबीएफसींचे व्यवस्थापन कार्यक्षम कसे केले जाईल याकडे लक्ष देण्याचे रिझर्व बॅंकेने ठरवले आहे. यासाठी वेगळा विभाग स्थापन करून त्याकरिता वेगळे मनुष्यबळ विकसित केले जाणार आहे.

गेल्या काही महिन्यापासून बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांच्या कामकाजाबाबत शंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे या संस्थांच्या कामाकडे लक्ष देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेत वेगळा विभाग स्थापन करण्याची गरज निर्माण झाल्याचे बॅंकेच्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीत ठरले. या बैठकीला बॅंकेचे गव्हर्नर शक्‍तिकांत दास उपस्थित होते. या बैठकीत बॅंकेने सध्याची आर्थिक परिस्थिती जागतिक परिस्थिती इत्यादीचा विचार केला. व्यावसायिक बॅंका, सहकारी बॅंका आणि बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था याकडे आगामी काळात अधिक लक्ष देणे देण्यात येणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.