“आयफा’मध्ये “राजी’ ठरला सर्वोत्कृष्ठ

आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार (आयफा) मध्ये “राजी’ल सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि आलिया भट्टला याच सिनेमामधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवडले गेले. त्याचबरोबर “पद्मावत’मधील्‌ अभिनयासाठी रणवीर सिंहला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही देण्यात आला आहे.

सर्वोत्कृष्ठ सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार “पद्‌मावत’साठी आदिती राव हैदरीला आणि “संजू’मधील रोलसाठी विकी कौशलला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

ईशान खट्टरला “धडक’साठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार आणि “केदारनाथ’साठी सारा अली खानला. श्रीराम राघवन यांना “अंधाधुन’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून निवडले गेले.

याशिवाय सर्वोत्कृष्ठ पार्श्‍वगायक म्हणून अरिजित सिंह, सर्वोत्कृष्ठ पार्श्‍वगायिका म्हणून हर्षदीप कौर आणि विभा सराफ यांना या समारंभात गौरवण्यात आले. ऍकेडमी ऍवॉर्डचे हे 20 वे वर्ष होते.

यंदाच्या पुरस्कार वितरणाच्या समारंभाचे सूत्रसंचालन आयुष्मान खुराना आणि अर्जुन कपूर यांनी केले. या कार्यक्रमादरम्यान सलमान खान, रणवीर सिंह, विक्की कौशल, माधुरी दीक्षित, कतरिना कैफ आणि सारा अली खान यांनी परफॉर्मन्स सादर केले. दीपिका पादुकोण, शाहिद कपूर, आलिया भट्ट यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)