रवीनाने घेतला आमिरचा बदला

आमिर खानला बॉलिवूडमध्ये “मिस्टर परफेक्‍शनिस्ट’ म्हणून ओळखतात. त्याच्या परफेक्‍शनचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. जसा तो परफेक्‍शनिस्ट आहे, तसाच तो प्रॅकस्टारही आहे. त्याची ही सवय फार पूर्वीपासूनची आहे. एकदा त्याने आपली सहकलाकार रवीना टंडनबरोबर असाच परफेक्‍शनच्या बाबत एक विनोद केला. पण हा विनोद आमिरच्या अंगाशी आला होता. “अंदाज अपना अपना’च्या शुटिंग दरम्यान आमिरने रवीनाच्या अंगावर गरम चहा सांडला होता.

रवीनाने या विनोदाचा बदला घेण्याचे ठरवले. कोरिओग्राफर सरोज खान आणि डायरेक्‍टर ऑफ फोटोग्राफीच्या संगनमताने कॅमेऱ्यात रोल न घालताच आमिरला तीन तास डान्स करायला लावले होते. “अंदाज अपना अपना’मधील प्रसिद्ध “इलोजी सनम हम आ गये…’या गाण्याच्यावेळी आमिरला इतका वेळ नाचवून देखील त्याची प्रतिक्रिया थंड होती. गाण्याच्या प्रत्यक्ष शुटिंगच्यावेळीही त्याची एनर्जी अजिबात कमी झालेली नव्हती.

मात्र ज्यावेळी या विनोदामागे रवीनाचा हात आहे, असे त्याला समजले, तेंव्हा त्याची रिऍक्‍शन काय होती, हे सांगणे कठिण आहे. स्वतः रवीनानेच हा किस्सा सांगितला आहे. त्याच्या गाण्याला प्रेक्षकांची दाद बघून तिला हा किस्सा आठवला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.