अहमदाबाद – गुजरातमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. (Ravindra Jadeja’s wife likely to be BJP candidate in Gujarat) सूत्रांच्या म्हणण्यानुसार पक्षाच्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले जाण्याचीच शक्यता आहे.
रिवाबा जडेजा गेल्या तीन वर्षांपासून भारतीय जनता पार्टीसोबत आहेत. त्यांनी 2016 मध्ये रवींद्र जडेजाशी विवाह केला. दरम्यान, यंदाच्या तिकीटवाटपात अनेक विद्यमान आमदारांना भाजपकडून नारळ दिला जाणार आहे. मात्र, हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांना रिंगणात उतरवले जाण्याची दाट शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा केंद्रीय निवड समितीत समावेश असून त्यांच्या संमतीनेच उमेदवारांची अंतिम यादी तयार केली जाणार आहे.
ब्रिटनमधील वेस्टमिडलँड आणि महाराष्ट्रात सामंजस्य करार करणार – मुख्यमंत्री शिंदे
गुजरात विधानसभा निवडणूक सलग सातव्यांदा जिंकण्याचे भारतीय जनता पक्षाचे लक्ष्य असून एकाचवेळी सर्व 182 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.