सिडनी – ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथचे दमदार शतक तर, अफलातून गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत भारताच्या रवींद्र जडेजाने तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस गाजवला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांवर संपूष्टात आला तर, भारताने दिवसातील उर्वरित खेळात आपल्या पहिल्या डावात सलामीवीर शुभमन गील याच्या अरधशतकी खेळीच्या जोरावर 2 गडी गमावून 96धावा केल्या आहेत.
दरम्यान, आजच्या सामन्यात शतकवीर स्टिव्ह स्मिथला चोरटी धाव घेताना रवींद्र जडेजाने अफलातून क्षेत्ररक्षण करत धावबाद केले.
स्मिथने आक्रमक फलंदाजी करताना एक फटका डीप स्क्वेअरलेगच्या दीशेने फटकावला. तीथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या जडेजाने धावतच चेंडू पकडला व सिमारेषेवरुन थेट चेंड फेक करत स्मिथला धावबाद केले. जडेजाचा चेंडू पकडून यष्टींवर फेकण्याचा वेग इतका अविश्वसनीय होता की तो क्षेत्ररक्षक आहे की सुपरमॅन असेच काही क्षण वाटले.