भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज नागपूरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लड ने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात इंग्लंडला 47.4 षटकात सर्वबाद 248 धावा करता आल्या. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलर आणि जेकब बेथेल यांनी अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून पदार्पण करणाऱ्या हर्षित राणा आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.
रवींद्र जडेजाच्या नावावर विक्रमाची नोंद
रविंद्र जडेजा वनडे वर्ल्डकप स्पर्धेत शेवटचा खेळला होता. या स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत त्याला एकपण विकेट भेटली नव्हती. त्यानंतर आता 452 दिवसानंतर त्याला विकेट मिळाली. रविंद्र जडेजाने 12 नोव्हेंबर 2023 रोजी वनडे क्रिकेटमध्ये नेदरलँडविरुद्ध 9 षटकात 49 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या.
रविंद्र जडेजाने या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 9 षटक टाकली. यात एक निर्धाव षटक टाकलं आणि 26 धावा देत तीन खेळाडू बाद केले. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 विकेट घेणारा पाचवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. वनडेत तिसरी विकेट घेताच त्याने या विक्रमाची नोंद केली आहे.
रवींद्र जडेजाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 2009 मध्ये भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. यात कसोटीत त्याने 323, वनडेत 223 आणि टी20 क्रिकेटमध्ये 54 विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 विकेट घेणारा पहिला डावखुरा फिरकीपटू ठरला.
भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
अनिल कुंबळे – 953
आर अश्विन – 765
हरभजन सिंग – 707
कपिल देव – 687
रवींद्र जडेजा – 600*