जामनगर – गुजरात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून प्रचाराची रंगत वाढली आहे. त्यातच भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा हा चक्क प्रचाराच्या मैदानात उतरला आहे. त्याने जामनगरवासियांना भाजपच्या उमेदवार व त्याची पत्नी रिवाबा जडेजाला निवडणून देण्याचे आवाहन केले आहे.
रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाला भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्या जामनगर येथून विधानसभेची निवडणूक लढवत आहे. यामुळे पत्नी रिवाबा आणि भाजपच्या प्रचारासाठी रवींद्र जाडेजा प्रचारात उतरला आहे. तो पत्नी रिवाबासह अनेक प्रचार सभा तसेच विविध कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत आहे.
रवींद्र जडेजाने ट्विटच्या माध्यमातूनदेखील जामनगरवासियांनो भाजपला प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे ट्वीट करून फोटो शेअर केला आहे. दरम्यान, जडेजाचे कुटुंब यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे. रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा या जामनगरमधून भाजपच्या उमेदवार, तर रवींद्र जडेजाची मोठी बहीण नैना जडेजा या जामनगरमध्ये गुजरात महिला कॉंग्रेसच्या महामंत्री आणि जामनगरच्या स्टार प्रचारक आहेत.