पुणे – कसबा विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ते आपला अर्ज शुक्रवारी दाखल करणार आहेत.
या आधीही धंगेकर यांनी खासदार गिरीश बापट यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती. तसेच 2017 च्या महापालिकेच्या निवडणुकीतही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीवेळी त्यांना कॉंग्रेसने पुरस्कृत केले.
यावेळी धंगेकर यांनी कॉंग्रेसकडे कसबा मतदार संघातून तिकीट मागितले होते.
तशी तयारीही त्यांनी गेल्या काही दिवसांपासून मतदार संघात सुरू केली होती. मात्र पक्षाने महापालिकेतील कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शक्तिप्रदर्शन करत शुक्रवारी अर्ज दाखल करणार असल्याचे धंगेकर यांनी सांगितले.