तारकांचे चाहते केवळ सामान्य व्यक्तीच असतात असे नाही तर सेलिब्रिटिज देखील कोणत्या ना कोणत्या नायक-नायिकांचे फॅन असतात. “मस्त मस्त गर्ल’ रविना टंडनचा विचार केल्यास ती एकेकाळी संजूबाबावर फिदा होती, अशी खबर लागली आहे. अर्थात ही खबर तिने खुद्द दिली आहे. संजय दत्तबरोबर तिने आतिश, जमाने से क्या डरना, विजेता, जीना मरना तेरे संग, यासारख्या चित्रपटात काम केले आहे.
हा खुलासा तिने नच बलिए-9 च्या सेटवर केला. संजय दत्त हा शोच्या सेटवर पोचला होता. संजय दत्तला पाहून रविना ही आपल्या मनातील भावना रोखू शकली नाही. आपण संजय दत्तवर फिदा होतो, अशी कबुली तिने सेटवर दिली. तो आपल्या आवडीचा अभिनेता होता, असे रविनाने सांगितले.
यादरम्यान, कार्यक्रमाचा संचालक मनीष पॉलला संजय दत्त हा तम्मा, तम्मा या शब्दाचा अर्थ सांगत होता. तो म्हणाला तम्मा तम्मा म्हणजे परफेक्ट व्यक्ती. परफेक्टचा विषय निघालाच आहे तर रविनासारखी दुसरी कोणतिच परफेक्ट व्यक्ती नाही. संजूबाबाच्या तारीफने रविना हुरळून गेली. रविनाने संजय दत्तबरोबर एक सेल्फी घेतला आणि सोशल मीडियावर शेअरही केला. सदासर्वकाळासाठी माझा आवडीचा हिरो अशी टॅगलाइन तिने दिली.