Ravichandran Ashwin Viral Video: टीम इंडियाचा वेगवान फिरकी गोलंदाज आर अश्विनने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. आता हिंदी भाषेसंदर्भात दिलेल्या वक्तव्यानंतर अश्विन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अश्विनने हे विधान तामिळनाडूतील चेन्नई येथील एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात केले आहे, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#Watch | தமிழுக்கு அதிர்ந்த அரங்கம்.. இந்திக்கு SILENT.. “இந்தி தேசிய மொழி இல்ல”.. பதிவு செய்த அஸ்வின்!
சென்னையில் உள்ள தனியார் பொறியியல் கல்லூரியில் நடைபெற்ற பட்டமளிப்பு விழாவில் மாஸ் காட்டிய கிரிக்கெட் வீரர் அஸ்வின்#SunNews | #Chennai | #Ashwin | @ashwinravi99 pic.twitter.com/TeWPzWAExQ
— Sun News (@sunnewstamil) January 9, 2025
अश्विनच्या हिंदी भाषेवरील वक्तव्यामुळे गदारोळ –
आता रविचंद्रन अश्विन हिंदी भाषेवरून बोलल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. चेन्नईत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना अश्विन म्हणाला की, हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. अश्विनच्या या विधानामुळे पुन्हा एकदा भाषेच्या वादाला तोंड फुटले आहे. आपल्या भाषणादरम्यान अश्विनने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला की कोणाला हिंदीत प्रश्न विचारण्यात रस आहे का, ज्यामध्ये कोणीही स्वारस्य दाखवले नाही. यानंतर अश्विन म्हणाला, ‘मला वाटलं हे सांगावं. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, ती अधिकृत भाषा आहे. आर. अश्विनच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. अश्विनने अशा मुद्द्यांवर भाष्य करणे टाळावे, असा युक्तिवाद काही लोकांनी केला. एका यूजरने लिहिले की, ‘अश्विनने असे बोलू नये. मला ते आवडत नाही. मी त्याचा चाहता आहे. तुम्ही जितक्या जास्त भाषा शिकता तितक्या चांगल्या. आमच्या फोनवर कोणत्याही भाषेचे भाषांतर उपलब्ध आहे. काय अडचण आहे, भाषेचा मुद्दा लोकांवर सोडा.
Ravichandran Ashwin : Hindi is not our national language, it is just an official language like many others. ( FACT)
Entire BJP Tamil Nadu and Sanghis have started targeting him, some are calling him Anti National and DMK agent.
This is the respect they have for a national… pic.twitter.com/KY54R2GQ3p
— Roshan Rai (@RoshanKrRaii) January 10, 2025
दरम्यान, भारतीय राज्यघटनेत हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आला आहे. तामिळनाडूमध्ये या भाषेचा वापर हा नेहमीच संवेदनशील विषय राहिला आहे. आता अश्विनच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती –
आर अश्विनने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये अश्विनने शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. अश्विनने टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 537 विकेट घेतल्या होत्या. आता अश्विन आयपीएल 2025 मध्ये सीएसकेकडून खेळताना दिसणार आहे.