ख्राईस्टचर्च : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला न्यूझीलंड दौऱ्यात सलग दुसऱ्या व्हाइटवॉशला सामोरे जावे लागले आहे. ख्राईस्टचर्च कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 131 धावांचे आव्हान 7 गडी राखत पूर्ण केले. यामुळे एकदिवसीय मालिकेपाठोपाठ (3-0) कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचे तोंड (2-0) पहावे लागले.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारतीय संघाचा हा पहिला मालिका पराभव ठरला. या पराभवानंतर नेटिझन्स भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर प्रचंड भडकल्याचे दिसून आले.
End of Ravi Shastri pic.twitter.com/cTmfDnRAUj
— Mogambo ✪ ❄️ (@UberHandle) March 1, 2020
रवी शास्त्री यांना पदावरून हाकलून द्या, अशी मागणी नेटिझन्सने केली. रवी शास्त्री यांना बडतर्फ करा, त्यांच्या जागी भारताला एखादा तंदुरुस्त प्रशिक्षक गरजेचा आहे, असे शास्त्रींवर टीका करणारे ट्विटही मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. फेसबुक, व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्रामवरही विविध मिम्स व्हायरल होत आहेत.