लंडन – भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना करोना संसर्गाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. रवी शास्त्री यांची लेटरल फ्लो टेस्ट शनिवारी संध्याकाळी पॉझिटिव्ह आली.
शास्त्री यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने खबरदारी म्हणून शास्त्री यांच्यासह चार जणांना आयसोलेट केलं आहे. यामध्ये गोलंदाजी प्रशिक्षक बी अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांचा समावेश आहे.
दरम्यान यांची आरटी-पीसीआर चाचणी झाली आहे आणि ते टीमसोबत हॉटेलमध्येच राहणार आहे. मात्र, वैद्यकीय पथकाकडून पुष्टी होईपर्यंत करोना संशयित टीम इंडियासोबत प्रवास करणार नाही, असं बीसीसीआयने म्हटलं आहे.