मुंबई – जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी ओळख असलेल्या बीसीसीआयने खेळाडूंबरोबरच प्रशिक्षकांनाही मालामाल केले आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना तब्बल 10 कोटी रुपये वार्षिक पगार देत बीसीसीआयने त्यांना जागतिक क्रिकेटमधील सर्वात पगारदार प्रशिक्षक बनवले आहे.
खेळाडूंच्या कामगिरीत चढउतार झाला की, त्यांच्यासह प्रशिक्षकांवरही आगपाखड केली जाते. त्यातही भारतीय क्रिकेटपटूंच्या बाबतीत सर्वाधिक अपेक्षा असतात. शास्त्री यांनी जेव्हापासून ही जबाबदारी घेतली तेव्हापासून खेळाडूंसह त्यांच्यावरील अपेक्षाही सामन्यागणिक वाढलेल्या दिसून आल्या आहेत. खरेतर शास्त्री यांनीही भारतीय संघाचे आजवरचे सर्वात जास्त यशस्वी प्रशिक्षक ठरत जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व राखले आहे.
सर्वाधिक पगार असलेले प्रशिक्षक
रवी शास्त्री- शास्त्री यांना बीसीसीआयकडून वर्षाला 9.5 कोटी ते 10 कोटी पगार मिळतो. सर्वाधिक पगार घेणारे ते प्रशिक्षक आहेत.
ख्रिस सिल्वरवुड – ख्रिस यांना इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाकडून वर्षाला 4.65 कोटी इतका पगार मिळतो.
मिकी ऑर्थर – श्रीलंकेचे प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांना श्रीलंका क्रिकेट मंडळ वर्षाला 3.44 कोटी रुपये पगार देते.
मिस्बाह उल हक – पाकिस्तानचे प्रशिक्षक मिस्बाह उल हक यांना पाकिस्तान क्रिकेट मंडळ 1.79 कोटी रुपये देते.
गॅरी स्टीड – न्यूझीलंडचे कोच गॅरी स्टीड यांना न्यूझीलंड क्रिकेट मंडळ वर्षाला 1.73 कोटी रुपये पगार देते.