मुंबई – ‘नटरंग’ , ‘बालगंधर्व’ , ‘बालक-पालक’ , ‘टाईमपास’ , ‘टाईमपास-२’ , ‘न्यूड’ असे एकापेक्षा हिट चित्रपट मराठी कलाविश्वाला देणारे प्रसिध्द दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा एकदा आपल्या नवीन प्रोजेक्टचा श्री गणेशा करत आहे.
नुकतंच रवी जाधव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, लवकरच ते सिनेरसिकांसाठी एक नवा-कोरा चित्रपट घेऊन येत आहे. लॉकडाऊन नंतर रवी जाधव यांचा हा पहिला चित्रपट असणार आहे. पण हा नेमका चित्रपट कोणता त्याचा विषय काय याबाबतची कोणती माहिती अद्याप समोर आलेली नाही.
View this post on Instagram
नवा प्रोजेक्ट. गणपती बाप्पा मोरया 🙏 #start #fun #magic #movie #newproject
रवी जाधव यांनी चित्रपटाच्या सेटवरचा गणेशपूजनाचा फोटो पोस्ट करत आपण नव्या सिनेमाच्या तयारीला लागल्याचं चाहत्यांना कळवलं आहे. त्यामुळे आता हा कोणता चित्रपट असणार आहे. यासाठी प्रेक्षकांना आणखी दिवस वाट पाहावी लागणार आहे.