बिश्केक – ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता कुस्तीपटू रवीकुमार दहिया याने रविवारी सरावादरम्यान गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे बिश्केक रॅंकिंग सिरीज स्पर्धेतून माघार घेतली. एकसष्ट किलो वजनी गटात रवीची पात्रता फेरीत किर्गिझस्तानच्या तैरबेक झुमाशबेक उलुशी लढत होती.
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकल्यानंतर दहियाची ही पहिलीच स्पर्धा होती. दरम्यान, याच प्रकारात पंकजने उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सहकारी आणि वेगवान प्रगती करणाऱ्या अमन सेहरावतविरुद्ध जेरोजियाच्या जिओर्गी गोनियाश्विलीवर 8-2 असा आत्मविश्वासपूर्ण विजय मिळवला.
तसेच मुलायम यादवने 70 किलो वजनी गटात पात्रता फेरी पार केली. त्याने कझाकिस्तानच्या डोझान असेतोव्हचा 9-4 असा आरामात पराभव केला. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत चार पदके जिंकली आहेत. महिला कुस्तीपटूंनी शनिवारी तीन पदके जिंकली तर एक ग्रीको-रोमन ग्रेपलर मनजीतने मिळवली.