डावखुऱ्या फलंदाजांसाठी अश्‍विन ठरतोय डोकेदुखी

अहमदाबाद – भारताचा ऑफस्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्‍विन डावखुऱ्या फलंदाजांसाठी सातत्याने डोकेदुखी ठरत आहे. श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनला मागे टाकत अश्‍विनने सर्वाधिक डावखुऱ्या फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम साकार केला.

इंग्लंडविरुद्धच्या गुरूवारी संपलेल्या तिसऱ्या कसोटीतही त्याने अष्टपैलु बेन स्टोक्‍सला बाद करत ही कामगिरी केली. त्याने स्टोक्‍सविरुद्धचे आपले वर्चस्वही पुन्हा एकदा सिद्ध केले.

या कसोटीत इंग्लंडच्या दुसऱ्या डावात अश्‍विनने स्टोक्‍सला पायचीत बाद केले. त्याने गेल्या 20 डावांत 11 डावात त्याला बाद केले आहे. डावखुऱ्या फलंदाजांसाठी अश्‍विनची गोलंदाजी डोकेदुखी ठरत आहे.

यापूर्वीही अश्‍विनने इंग्लंडचा माजी कर्णधार अलिस्टर कूकला 9 वेळा, ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला 10 वेळा, ऍडम किविनला 7 वेळा तर, जेम्स ऍण्डरसनला 7 वेळा बाद केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.