Rasha Thadani | बॉलीवूडची अभिनेत्री रवीना टंडनची लेक राशा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. राशा लवकरच बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. मात्र त्यापूर्वी राशाचे नाव एका भारताच्या क्रिकेटपटूबरोबर जोडले जात आहे. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
भारतीय क्रिकेटपटू कुलदीप यादवसोबत तिचं नाव जोडलं जात आहे. कुलदीप यादवने राशाचे आणि तिच्या मित्र-मैत्रिणींसोबतचे काही फोटो लाइक केल्याने या चर्चा सुरू झाल्या आहेत. राशाच्या पोस्टवर तमन्ना भाटिया आणि डायना पेंटीसोबतचे फोटो होते. मात्र डेटींगच्या या चर्चांवर दोघांनीही कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. पण सोशल मीडियावर मात्र या दोघांच्या अफेअर्सची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, राशाचा जन्म १६ मार्च २००५ या रोजी झाला. त्यानंतर राशाने मुंबईतील धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपले १२ पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचबरोबर राशा ही कोरियन मार्श आर्ट्समध्ये ब्लॅक बेल्ट आहे. राशा लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अजय देवगणबरोबर ‘आझाद’ सिनेमात ती दिसणार आहे.
दुसरीकडे, कुलदीप यादव नुकताच जर्मनीहून परतला असून, तो सध्या दुखापतीतून सावरत आहे. लवकरच तो भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: