मुंबई – अभिनेत्री रवीना टंडनची लेक राशा टंडन हिचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. राशाची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. राशा टंडन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राशा अजय देवगणचा पुतण्या अमन देवगणसोबत चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.
अशातच रवीनाने मध्य प्रदेशातील भोपाळ शहराजवळील जगप्रसिद्ध भोजपूर मंदिरात जाऊन भोजेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. रवीनाच्या लेकीने पूजा करून आशीर्वाद घेतले.
अभिषेक कपूरच्या ‘आझाद’ या चित्रपटातून राशा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आझाद हा एक अॅक्शन आणि साहसी चित्रपट असेल. ज्याची तयारी जोरात सुरू आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. जवळपास 15 ते 20 दिवस या चित्रपटाचे शूटिंग जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये चालणार आहे. राशासोबत रवीनाही उपस्थित आहे.
रवीना टंडनने भोपाळच्या जहाँनुमा रिट्रीटमध्ये मुलगी राशाचा 18 वा वाढदिवस साजरा केला. राशाचा जन्म 16 मार्च 2005 रोजी झाली, ती फक्त 18 वर्षांची आहे. राशासाठी येथे सरप्राईज पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक अभिषेक कपूर, रवीना टंडन, तिचा पती अनिल थडानी यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक लोक उपस्थित होते.