Raveena Tandon | अभिनेत्री रवीना टंडनने सिनेसृष्टीतील एक काळ चांगलाच गाजवला. मात्र अभिनयासह रवीना तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यानंतर तिच्या राजकारणातील प्रवेशाबाबतची चर्चा रंगली आहे.
तिला अनेकदा राजकारणातील एन्ट्रीची ऑफरही आली होती, मात्र तिने प्रत्येकवेळी नकार दिला. यामागचे कारणही तिने सांगितले आहे. रवीनाने व्हिडिओमध्ये तिच्या प्रामाणिकपणाच्या सवयीमुळे आणि चुकीचं काम सहन न होत असल्यामुळे राजकारणात राहणं तिच्यासाठी आव्हानात्मक असल्याचे सांगितले. Raveena Tandon |
व्हिडिओत रवीना म्हणाली की, “मी प्रामाणिक आहे आणि चुकीची कामं सहन करु शकत नाही. याच सवयींमुळे मी कधी राजकारणात उतरले नाही. मी ज्या दिवशी राजकारणात येईन त्या दिवशी माझ्या या सवयींमुळे मला कोणीही गोळी मारतील. मी सत्याला खोट्यात बदलू शकत नाही. माझ्यासाठी हे कठीण आहे.”
पुढे ती म्हणाली, “मला जे आवडत नाही ते माझ्या चेहऱ्यावर लगेच दिसून येतं आणि मग मी त्या गोष्टीसाठी लढते. आजच्या जगात प्रामाणिकपणा चांगली गोष्ट राहिलीच नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा मला कोणीही राजकारणात येण्यास सांगतं तेव्हा मी म्हणते की, मी आले तर लवकरच माझी हत्या केली जाईल.” Raveena Tandon |
तिने राजकारणात येण्याचेही निश्चित केले होते. त्याबाबत तिने सांगितले की, “एक वेळ अशी आली होती जेव्हा मी खरंच राजकारणात यायचा विचार केला. पश्चिम बंगाल, मुंबई आणि पंजाबसह अनेक राज्यांतून मला जागा ऑफर झाल्या होत्या. पण मी हो म्हणू शकले नाही. त्यामुळे ही ऑफर मी नाकारली होती.” Raveena Tandon |
रवीना टंडनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीने १९९१ मध्ये ‘पत्थर के फुल’ या सिनेमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने ‘मोहरा’, ‘दिलवाले’, ‘आतिश’ यांसारख्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले. ती शेवटची ‘पटना शुक्ला’मध्ये वकिलाच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती.
हेही वाचा:
Sanjay Raut : अमेरिकेकडून अदानींविरोधात अटक वॉरंट जारी होताच संजय राऊतांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया