बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन 26 ऑक्टोबरला तिचा वाढदिवस साजरा करत आहे. रवीनाने ‘आँखी से गोली मारें’, ‘दो चेहरे’, ‘सत्ता’, ‘कीमत’ सारखे चित्रपट करून इंडस्ट्रीत एक वेगळे स्थान निर्माण केले. आता ती ओटीटीवरही वेगवेगळी भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. अभिनयासोबतच रवीनाला राजकारणात येण्याचीही संधी होती, पण तिने ती नाकारली. पण तिला या निर्णयाचा पश्चाताप झाला.
गेल्या वर्षी रवीना टंडन राजकारणात येण्याची शक्यता वर्तवली जात होती. तिच्या आधी हेमा मालिनी, जया बच्चन आणि उर्मिला मातोंडकर यांच्यासह अनेक अभिनेत्रींनी राजकारणात प्रवेश केला होता, पण रवीनाने या अफवांना पूर्णविराम दिला.
तिने निवडणूक लढवली नसली तरी तिला ऑफर नक्कीच आल्या. रवीनाने तिच्या मुलाखतीत सांगितले होते की, एकदा काँग्रेसची इच्छा होती की तिने गोविंदाच्या जागी निवडणूक लढवावी, परंतु तिने ऑफर स्वीकारली नाही. लहरेन रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत रवीना टंडनने तिच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल मनमोकळेपणाने चर्चा केली.
पद्मश्री मिळाल्यामुळे ती भारतीय जनता पक्षाचे खास मानली जाते ? या प्रश्नावर रवीना म्हणाली, मी भाजपसाठी खास आहे का? काँग्रेसच्या काळातही मला अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मला त्यांचा उल्लेख करावा लागेल असे वाटते. मला काँग्रेसने उत्तर मुंबईत गोविंदाची जागा ऑफर केली होती, पण मी राजकारणात येण्यास तयार नव्हते.’
रवीना टंडननेही राजकारणात येण्याबाबत सांगितले आणि आता राजकारणात न आल्याचा पश्चाताप होत असल्याचे सांगितले. ती म्हणाली होती, “एक काळ असा होता जेव्हा मी प्रत्येक विषयावर गांभीर्याने विचार करत असे. मला संपूर्ण भारतात – पश्चिम बंगाल, पंजाब, मुंबई अशा जागा लढवायला मिळाल्या होत्या, पण दुर्दैवाने, काही प्रमाणात मी तयार नव्हते म्हणून मला त्यावेळी नाही म्हणावं लागलं. माझ्यावर कोणत्याही राजकीय पक्षाचा इतका प्रभाव पडलेला नाही की मी त्यांच्या विचारसरणीचे आंधळेपणाने अनुसरण करू शकेन.’