ऑगस्टा वेस्टलॅन्ड प्रकरणी रतुल पुरी यांना जामीन मंजूर

नवी दिल्ली : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ आणि उद्योगपती रतुल पुरी यांना आज दिल्लीतील न्यायालयाने ऑगस्टावेस्टलॅन्ड मनी लॉन्डरिंग प्रकरणी जामीन मंजूर केला. पुरी यांना 5 लाख रुपयांच्या वैयक्तिक जामीन आणि तितक्‍याच रकमेच्या दोन हमीदारांच्या आधारे जामीन मंजूर करण्यात आला आहे.

रतुल पुरी यांना बॅंक गैरव्यवहाराच्या एका अन्य प्रकरणीही अटक करण्यात आली असल्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका होणार नाही. तपासासाठी आपली आवश्‍यकता नसल्यामुळे कोठडीमध्ये ठेवले जाणे गरजेचे नाही, असे पुरी यांनी आपल्या जामिनासाठीच्या अर्जामध्ये म्हटले होते.

सक्‍तवसुली संचलनालयाने अलिकडेच रतुल पुरी आणि जसप्रीत आहुजा यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. जानेवारी 2014 मध्ये भारताने फिन्मेकॅनिका कंपनीची उपकंपनी ऑगस्टा वेस्टलॅन्डकडून 12 व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदीचा करार रद्द केला होता. या प्रकरणी 423 कोटी रुपयांची दलाली दिली गेल्याचा आरोप आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.