मुंबई – झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी ‘रात्रीस खेळ चाले 2’ ही मालिका महाराष्ट्रातील घराघरांत पहिली जाती. या मालिकेत बऱ्याच घडामोडी होतच असतात. मालिकेमध्ये अनेक रहस्यमय घटना समोर येत असतात. त्यामुळे ‘रात्रीस खेळ चाले 2’ ही मालिका पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढते. आता ही मालिका हिंदीमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे.
या मालिकेचे नाव ‘रात का है खेल सारा’ असे ठेवण्यात आले असून अॅन्ड टीव्ही वाहिनीवर ही पाहायला मिळणार आहे. दरम्यान, यापूर्वी देखील सब वाहिनी वरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मराठी मध्ये डब करण्यात आली असून, कलर्स मराठी वाहिनीवर ही मालिका पाहायला मिळत आहे.