Pune : मार्केट यार्डमध्ये रत्नागिरी-देवगड आंब्याची आवक वाढली

पुणे – मार्केट यार्डात रत्नागिरी आणि देवगड येथून येणाऱ्या हापूसची मागणी वाढली आहे. रविवारी येथील घाऊक बाजारात दीड ते दोन हजार पेट्या इतकी आवक झाली. केरळ, कर्नाटक येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे देशातील विविध भागात आणि परदेशात आंब्यार्ची निर्यात वाढली आहे.

त्यामुळे नेहमीच्या तुलनेत येथील बाजारात 40 ते 60 टक्केच दाखल होईल, असा अंदाज श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज कांची यांनी वर्तविला आहे.
कच्चा हापूसच्या 4 ते 7 डझनाच्या पेटीस 3 ते 6 हजार रुपये भाव मिळत आहे.

शहरासह परिसरासह अहमदनगर जिल्ह्यातुन आंब्याला मागणी आहे. कच्चा हापुसची आवक असून आठ दिवसानंतर तो खाण्यासाठी तयार होईल, असे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी करोनामुळे परदेशात आंब्याची निर्यातच झाली नाही. यावर्षी मात्र निर्यात जास्त होत आहे.

त्यातच परराज्यातून आणि राज्यातील इतर भागातून आवक असल्याने शहरात नेहमीच्य तुलनेत कमी आवक होणार आहे. दरम्यान काची मॅंग़ोच्या वतीने पुणेकरांना घरपोच आंबे मिळणार आहेत. इच्छुकांनी 7385187738 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन युवराज काची यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.