रत्ना हापूसची मार्केट यार्डात आवक

घाऊक बाजारात आंब्यास प्रति डझनास 1 हजार रुपये भाव

पुणे – गोड चवीच्या 300 ते 400 ग्रॅम वजन असलेल्या रत्ना हापूसची आवक मार्केट यार्डातील फळ विभागात सुरू झाली. पुढील 20 दिवस ही आवक सुरू राहणार आहे. घाऊक बाजारात आंब्यास प्रति डझनास 1 हजार रुपये भाव मिळाला. गेल्या वर्षीही सुरुवातीला इतकाच भाव मिळाला, असे व्यापारी बाप्पू भोसले यांनी सांगितले.

कोकणातील रायगड जिल्ह्यातील मंडणगड येथील शेतकरी रमेश खोत यांच्या बागेतून 160 डझन आंब्याची मार्केट यार्डात आवक झाली. या आंब्याची आवक वर्षातून दोनवेळा होते.

या हंगामातील ही पहिलीच आवक आहे. पुणे शहर, उपनगरांतील फळविक्रेत्यांनी आंब्याची खरेदी केली. त्यावेळी नीलेश थोरात, राम नरवडे, पांडुरंग हराळे, संजय वखारे, रामदास गायकवाड, प्रताप निकम, किरण ननावरे आदी उपस्थित होते.

याबाबत बाप्पू भोसले म्हणाले, दरवर्षी या आंब्याची ग्राहक आवर्जून वाट पाहत असतात. आंब्याला चांगली मागणी असून, सर्व आंब्याची विक्री झाली. येत्या काही दिवसांत आंब्याची आवक आणखी वाढेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.