संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार रतन टाटा?

मुख्य अतिथी म्हणून आमंत्रण

नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा टाटा समूहाचे अध्यक्ष आणि जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे, त्यांना संघाकडून निमंत्रण देण्याची सूत्रांची माहिती आहे. हा कार्यक्रम दि. 16 जून रोजी नागपुरात रेशीमबाग मैदानावर आयोजीत करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे मागील वर्षी याच संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते. संघ शिक्षा तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाला संघात अतिशय महत्त्वाचे मानले जाते. यंदा नागपुरात 23 मे पासून वर्गाला सुरुवात झाली आहे. या वर्गात देशभरातून 828 तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर 16 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे. याच प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून रतन टाटा यांना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे मागील वर्षी याच संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी वैचारिक मतभेद असल्याने मुखर्जींनी या कार्यक्रमात सहभागी होऊ नये, असे कॉंग्रेसचे म्हणणे होते. मात्र, मुखर्जी यांनी ठामपणे हे आमंत्रण स्वीकारले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.