मुंबई- भारतातीलच नाही तर जगातील नामवंत उद्योजक रतन टाटा हे सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात आणि जुने फोटो शेअर करत असतात. इंस्टाग्रामवर लहानपणीचा फोटो शेअर करून त्यांनी शाळेच्या दिवसांच्या आठवणींना उजाला दिला.
मुंबई आणि शिमल्यात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1955मध्ये न्युयॉर्क शहरात रिवरडेल कंट्री स्कूल येथे शिक्षण पुर्ण केले. गुरुवारी 82 वर्षीय रतन टाटा यांनी #ThrowbackThursday वापरत हा फोटो शेअर केला आहे. शाळेतील ईयर बुुकमधील हा फोटो आहे.
‘अपने दोस्त लोउ और रूडी के बारे में सोचते हुए, इस गुरुवार स्कूल के दिनों की एक झलक पेश कर रहा हूं. मेरे स्कूल रिवरडेल कंट्री स्कूल. 1955 की ईयरबुक से एक छोटा सा हिस्सा.’ हा फोटो शेअर करत त्यांना कॅप्शन दिलं आहे.
या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स चा पाऊस पाडला आहे. काही जण म्हणाले की, तुम्ही सिनेमामध्ये काम केले असते तर सुपरस्टार झाला असतात. तर काही जणांनी रतन टाटा यांना भारतरत्न दिलं जावं अशी मागणी केली आहे.